Educational News

Oct 14, 2021

या आठवड्यात एज्युकेशन ऑन व्हील या आपल्या संस्थेला दोन फोन आले.

एक बालकल्याण समिती मधून तर दुसरा कळवण येथील भागूरडी गावातील आजोबांचा.
एका मुलाचे वडील वारले तर दोन भावंडांची आई वारली.
दीड एकर जमीन त्यात पाच भावांची वाटणी.. शेती परवडत नाही त्यात दुष्काळ.. गावांमध्ये पाचवीच्या पुढे शाळा नाही.. या सगळ्या परिस्थितीमध्ये हताश होऊन आजोबांनी फोन केला तर दुसरा फोन बाल कल्याण समिती ने.. दोन मुलांना आई नाही आहे व वडील हातावरील मजुरी करतात ते त्यानां सांभाळू शकत नाही म्हणून वडील स्वतः मुलांना घेऊन बालकल्याण समितीत आले. या मुलांना कुठे काही आश्रम शाळेत शिकवता येईल का हे बघायचे होते. जेव्हा आपल्याकडे केस आली त्यावेळेस त्या मुलांचं त्यांच्या आई-वडिलांचा कौन्सलिंग करून सर्वात उत्तम ज्या काही आश्रम शाळा होत्या त्या आश्रम शाळेमध्ये त्यांचा दाखला काढण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया संस्थेतर्फे करण्यात आली. मुलांच्या समुपदेशनात लक्षात आले की मुलं तशी खूप हुशार आहेत त्यातला एक मुलगा तर पहिली ते चौथी नेहमी वर्गात पहिला येत होता. मग त्यांना उत्तम आश्रम शाळा त्यासाठी शोधल्या यादी बरेच विद्यार्थी वेळ आश्रम शाळेत पाठवलेले आहेत ज्यामध्ये मुलांस मध्ये विधायक बदल झालाय असे काही शिक्षक आम्हाला माहिती असतात म्हणून खास अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्या शिक्षकांच्या स्वाधीन करतो. यांना उमराळे येथील आश्रम शाळेत तसेच बोरकर येथील आश्रम शाळेमध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ता आणि स्पेलर फॅमिली चे मेंबर साधना पवार यांनी मदत केली. आत्तापर्यंत ६५०० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणलेला आहे आणि अजुनी काउंटिंग चालूच आहे..

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक